कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचा विस्तार व लोकसंख्येची वाढ लक्षात घेऊन आम्ही ही, परिवर्तन हेल्पलाईन लोकांच्या सोयीसाठी घेऊन आलो आहोत. सामान्य नागरिकांना भेडसावणारे प्रश्न जसे कि वीज, पाणी, ड्रेनेज, पथदिवे रस्ते, अपघात आजार अश्या सर्व समस्येंच उत्तर म्हणजे परिवर्तन हेल्पलाईन. आज प्रत्येक नागरिकाला वेळोवेळी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावेळी प्रशासनाकडे मारण्यात येणाऱ्या फेऱ्या या सर्व गोष्टींमुळे नागरिक त्रस्त होतात अश्या वेळी ही हेल्पलाईन आपल्याला नक्की वरदान ठरेल यात शंकाच नाही. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक त्यांच्या समस्येचे फोटो काढून आम्हाला व्हाट्सअप वर अथवा वेबसाईड वर पाठवू शकता आम्ही त्यांची समस्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करू.
९११ ९४४ ९०९९ हा क्रमांक तुमच्या हक्काचा क्रमांक समजा, या क्रमांकावर तुम्ही आम्हाला फोन करूनही आपली समस्या मांडू शकता आम्ही तुमची समस्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करू..
समस्या अनेक पर्याय एक
परिवर्तन हेल्पलाईन
९११ ९४४ ९०९९
उद्दिष्ट्ये
सन १९८१ साली खंडू भाऊ ठाकरे व लताबाई खंडू ठाकरे यांच्या पोटी वांजळे या छोट्याशा खेडेगावात माझा जन्म झाला. माझे वडील वडिलोपार्जित शेती व दुग्धव्यवसाय करून पोट भरत असत. या गरीब परंतु संस्कारी घरात माझे बालपण छान गेले. रायगड जिल्हा परिषदेच्या वांजळे शाळेत माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. तर याच ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या काळभैरव शाळेत माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शालेय जीवनात अभ्यासाकडे माझा कल बेताचाच होता, पण म्हणतात ना, “बिघडी को सुधारना मेरा पेशा ही नहीं, मेरा धर्म है,” तसंच काहीसं माझंही होतं. इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त करण्याबाबत मला प्रचंड रुची होती. या सर्व अतिरिक्त बाबी विचारात घेता मी कसेबसे बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे आवड लक्षात घेता शेती व दुग्धव्यवसायात वडलांना मदत करता करता मी कल्याण येथे जाऊन रीतसर टेलिव्हिजन, टेपरेकॉर्डर, मिक्सर यासारखी उपकरणे दुरुस्त करण्याचे शिक्षण आत्मसात केले व अल्पावधीतच कर्जत सारख्या परिसरात मी टेलिव्हिजन, टेपरेकॉर्डर, मिक्सर यासारखी उपकरणे दुरुस्त करू लागलो. रात्री छंद म्हणून मी गावात चालणाऱ्या भजन व कीर्तनाकडे आकृष्ट झालो आणि येथेच मी मृदुंग व तबला ही दोन कलावाद्ये अगदी सहजरित्या आत्मसात केली. आजही कुठेही भजन चालू असेल तर माझे पाय त्या दिशेकडे आपसूकच वळतात आणि माझी बोटे तबल्याच्या शाईवर फिरण्यासाठी आतुर होतात. बदलत्या काळानुसार आपणही बदलले पाहिजे म्हणून काळाची पावले ओळखून टेलिव्हिजन दुरुस्तीसह केबल व्यवसायातही मी पदार्पण केले. पाच वर्षे हा व्यवसाय मी जिकिरीने सांभाळला. परंतु डी२एच च्या आगमनानंतर आमच्या केबल व्यवसायात हळूहळू मंदी येऊ लागल्याने आम्ही भावंडांनी मिळून कर्जत येथे कपड्याचा व्यवसाय सुरु केला. परंतु या व्यवसायात देखील आम्हाला अपयश आले व होता नव्हता तो सारा पैसा आम्ही यात गमावून बसलो. परंतु म्हणतात ना, “ज्याने दात दिले तो दाण्याचीही व्यवस्था करतोच,” याच उक्तीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकारी लोकांशी माझी ओळख वाढली. त्यांना माझा स्वभाव नम्रपणा, किंवा माझी चिकाटी म्हणा, अखेर मला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पहिले १ लाख रुपयांचे माथेरान येथील सरकारी रेस्ट हाऊसच्या दुरुस्तीचे काम मिळाले व येथेच माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. यानंतर अनेक कामे केल्यानंतर अखेर एक कोटी इतक्या रक्कमेचे पेठारवाडी चाफेवाडी नदीवरील पुलाचे काम मला मिळाले व या कामानंतर खऱ्या अर्थाने आमच्या कुटुंबाला स्थैर्य प्राप्त झाले.. Read More
आपली तक्रार येथे नोंदवा
लेखाशीर्ष २५१५ अतंर्गत काळ्याचीवाडी गावातील अंतर्गत रस्ता तयार करणे ता.कर्जत या विकासकामाचे भूमिपूजन भाजपा कर्जत
आगामी मावळ लोकसभेच्या निवणुकीच्या अनुषंगाणे प्रचारासाठी जिल्हा परिषद विभाग नुसार आढावा बैठका घेण्यात येत असून भारतीय जनता पक्षाची बीड जिल्हा परिषद वार्डची
३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.
लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त हार्मनी फाऊंडेशन, आर.झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल
भारतीय जनता पक्षाचे कर्जात खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. किरणदादा ठाकरे यांच्या
भारतीय जनता पक्षाचे कर्जत विधानसभा अध्यक्ष श्री.किरणदादा ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नेरळ येथील प्रशांत मुल्ले
सुविधा