Skip to content
- १) आपल्या या कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रात १०० बेड्सचे सुसज्ज असे रुग्णालय स्थापन करून स्थानिक नागरिकांना योग्य अशी सुविधा उपलब्ध करून देणे.
- २) आपल्या विधानसभा क्षेत्रातून बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीवर होणारे प्रदूषण कायमस्वरूपी रोखणे तसेच मृत झालेल्या नद्यांचे पुनर्जीवीकरण करणे
- ३) या विधानसभा क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प राबवून त्यातून रोजगार निर्मिती व स्वच्छ व सुंदर शहर निर्माण करणे.
- ४) शासनाचे अभियांत्रिकी विद्यालय परिसरात उभारण्याकरिता शासन दरबारी प्रयत्न करणे.
- ५) माथेरान व भीमाशंकर येथे अद्यावत रोपवेच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे.
- ६) खालापूर व खोपोली येथे असलेल्या आद्योगिक क्षेत्रात जास्तीत जास्त स्थानिक तरुणांना नोकरी मिळवून देणे.
- ७) सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या कळंब व पाथरज या जिल्हापरिषद वॉर्ड हद्दीत पाणीपुरवठ्याची कायस्वरूपी व्यवस्था करणे.
- ८) निसर्गाच्या सानिध्यात अतिदुर्गम भागात वसलेल्या बेरोजगार तरुणांना कायस्वरूपी रोजगार उपलध करून देणे.
- ९) चोरी व घरफोडीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन संपूर्ण विधानसभा क्षेत्र सीसीटिव्ही च्या निगराणी खाली आणणे.
- १०) पाली धरणाच्या पाण्याचा वापर रेल्वेशी संलग्न वाढलेल्या व विकसित झालेल्या (हालिवली ग्रामपंचायत ते शेलू ग्रामपंचायत) या शहराची पाणीटंचाई दूर करण्याकरता योजना तयार करणे.
- ११) मौजे वंजारवाडी येथे राखीव असलेल्या शासनाच्या जागेवर महाराष्ट्र भूषण पूजनीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे भारतातील सर्वात भव्य स्मारक उभारून तेथे नानासाहेब धर्माधिकारी फाउंडेशनच्या मार्फत विविध समाजउपयोगी कार्यक्रम राबवणे.
- १२) शिवस्पर्शाने पावन झालेल्या या विधानसभा क्षेत्रात अनेक गडकिल्ले आपले अस्तित्व टिकवून उभे आहेत. त्यांना उर्जितअवस्था प्राप्त करून देऊन या विधानसभा क्षेत्राचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे.
- १३) सुंदरतेच्या दृष्टीकोनातून विचार केला असता आपल्या विधानसभा क्षेत्रात एकही सुसज्ज असे पार्क नाही वांजळे येथे राखीव असलेल्या वन विभागाच्या जागेत अद्यावत वनाची निमिर्ती करून पर्यटनास वाव देणे.
- १४) नेरळ पूर्व ते पश्चिम यांना जोडणाऱ्या पुलाची निमिर्ती करणे.
- १५) वाचनालयाने युक्त असे भव्य आंबेडकर भवन निर्माण करणे.